विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 19/7/2026 :

सध्या दूरदर्शन किंवा मोबाईल पाहण्याचे आपल्याला सर्वांनाच व्यसन लागले आहे. बाहेरून घरात आल्यावर एकमेकांशी ख्यालीखुशालीच्या गप्पा मारण्याऐवजी आपण दूरदर्शन संच चालू करतो व हातात रिमोट घेऊन बसतो.

काय पाहतो नेमके? तेच तेच फालतू विषय असलेल्या मालिका किंवा हाणामारीचे सिनेमे. ज्यांमधून आपल्याला नकारात्मक ऊर्जाच जास्त मिळते, जी आपल्या जडणघडणीसाठी धोकादायक असते.

मुलांनो, आपल्यातील संवेदनशीलता कमी होत चालली आहे. आपण एकमेकांशी मायेने, आपुलकीने वागण्याऐवजी तुलना करू लागलो आहोत. आपल्यातील कठोरपणा वाढला आहे, आपण काही प्रमाणात हिंस्र वागू लागलो आहोत. कोणाला घाबरत नाही, त्यामुळे मनाला येईल तसे वागणे चालू असते.

हे सगळे वेळीच थांबले पाहिजे. दूरदर्शन व मोबाईलपासून शक्य तितके दूर राहू व स्वतःला वाचवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या