विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/ 2026 :
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले_ या उक्तीप्रमाणे आपले वर्तन असावे असे मोठे लोक म्हणतात. बोलता तर सर्वांना येते. कसे बोलावे ही एक कला आहे पण बोलल्याप्रमाणे वागणे हे चारित्र्य आहे.
बोललेले आपले शब्द खरे करण्याची, आपण जसे बोलतो तसेच वागण्याची आपली जबाबदारी असते. नुसतेच बोलणारे व तसे न वागणारे फक्त बोलबच्चन म्हणून ओळखले जातात.
मुलांनो, आपले पालक, शिक्षक आपल्याला नेहमी खरे बोलण्याची शिकवण देतात. त्याच्या जोडीला आपण बोलल्याप्रमाणे वागण्याचा पण प्रयत्न करू. फसव्या शब्दांचे बुडबुडे सोडण्यापेक्षा शब्दांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू.
फुकाचे शब्द बोलून समोरच्याला फसवण्यापेक्षा बोललेले शब्द कृतीतून जगू व विश्वास संपादन करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या