मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/07/2026 :
आपल्या अवतीभोवती असणारी माणसे वेगवेगळ्या स्वभावाची असतात. मायाळू-प्रेमळ असतात तशी कठोर, कडक स्वभावाची पण असतात. कोणी लबाड असतात तर कोणी अती प्रामाणिक असतात.
तोंडावर गोड बोलणारी माणसे अनेकदा मागे निंदा करत असतात. स्पष्ट व खरे बोलणारी माणसे बहुतेक कोणाला आवडत नाहीत. त्यांचे बोलणे मनाला लागते, अपमानास्पद वाटते. अशा माणसांना लोक टाळतात.
खरे तर आजारी पडल्यावर डॉक्टरांनी दिलेले औषध-गोळ्या कडू असल्या तरी नाक दाबून आपण पितो-खातो. बरे होणे हा मूळ हेतू असतो. अगदी तसेच हे खरे बोलणाऱ्या लोकांचे बोलणे असते.
आजचा संकल्प
सभोवतालच्या माणसांमधील आपल्याशी प्रामाणिकपणे वागणारी, सत्य ते स्पष्ट सांगणारी, वेळीच कानउघडणी करणारी माणसे जवळ करू व स्वतःमध्ये सुधारणा करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या