🟣 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


🟣 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 31/7/2026 :

भारतीय जनता पार्टी व लहुजी साम्राज्य, अकलूज शहर

यांच्या संयुक्त विद्यमाने  मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक नवनाथ (भाऊ) साठे मित्र परिवार अकलूज, ता. माळशिरस यांनी सांगितली.

 सामाजिक उपक्रमा मध्ये १०० गरजू मुलींच्या नावे प्रत्येकी ₹ ५,००० ची बँकेत मुदत ठेव (FD), अकलूज नगरपरिषदेतील सफाई महिला कर्मचाऱ्यांना पैठणी साडी वाटप, अकलूज परिसरातील लाडक्या बहिणींना मोफत साडी वाटप, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ५,००० मोफत वह्यांचे वाटप, १,००० केशर आंबा रोपांचे मोफत वाटप, अकलूज परिसरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सन्मान सोहळा, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा इत्यादी महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकार पुरस्कारा साठी  अकलूज वैभव आणि  वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, निनाद पाटील, नागेश लोंढे, सुखदेव साठे, सचिन रणदिवे, गौतम भंडारे, गणेश जाधव, अमोल साठे, शाहरुख मुलाणी, नौशाद मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर (माजी खासदार, माढा लोकसभा), हे भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राम विठ्ठल सातपुते  ( माजी आमदार, माळशिरस विधानसभा), हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार,  प्रकाश पाटील (अध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव), सचिन शिंदे (जिल्हा सरचिटणीस, भाजपा), सुजयसिंह माने-पाटील (अकलूज मंडल अध्यक्ष, भाजपा), महादेव कावळे (शहराध्यक्ष, भाजपा, अकलूज) डॉ अक्षय वाईकर (माजी युवा शहराध्यक्ष),  महेश शिंदे  (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद), राहुल लोंढे  (नगरसेवक, अकलूज नगरपरिषद), सौ. जयश्री एकतपूरे (नगरसेविका, अकलूज नगरपरिषद), सौ. दिपाली वाघमोडे ( नगरसेविका, अकलूज नगरपरिषद), सामाजिक कार्यकर्ते शामाभाऊ कर्चे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जुने बस स्टँड समोर अकलूज येथे शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वा. संपन्न होणाऱ्या जयंती समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक नवनाथ (भाऊ) साठे मित्र परिवार अकलूज, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या