रानभाजी - फोडशी

 


रानभाजी - फोडशी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 21/7/2026 :

*इतर नावे* : फोडशी,कुलु,काल्ला,धापा,पांढरी मुसळी

फोडशी ही पावसाळ्यात रानटी स्वरूपात उगवणारी पौष्टिक व औषधी रानभाजी आहे. दिसायला गवता सारखी पण लांबट व रुंद पाने असणारी ही भाजी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानली जाते. या भाजीची चव माती सारखी असते आणि ती प्रामुख्याने कांदा, लसूण, व शेंगदाण्याचा कूट किंवा डाळ घालून बनवली जाते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

*पाककृती*

# साहित्य - कुलू च्या २ ते ३ जुड्या, २ कांदे चिरुन, पाव वाटी कोणतीही डाळ भिजवून, ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन, २ मिरच्या चिरुन, ओलं खोबरं अर्धी मुठ, चवीनुसार मिठ, १ चमचा टोमॅटो सॉस नसल्यास साखर.

# कृती - कुलू ची एक एक पाती वेगळी करून घ्या. खाली जास्त पांढरा भाग असल्यास काढा. मध्ये जर कडक दांडी असेल तर काढा आणि स्वच्छ धुवून चिरुन घ्या. भांड्यात तेल तापवून त्यावर लसुण पाकळ्या व मिरच्यांची फोडणी देउन कांदा घाला. त्यावर हिंग, हळद घाला व परतवून डाळ घालून परत परता. आता ह्यावर चिरलेली भाजी घाला व झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढून परता. भाजी बसल्यामुळे व्यवस्थित परतता येते. भांड्याच्या बाहेर जात नाही. ह्यावर मिठ घाला व डाळ शिजू द्या. डाळ शिजली की वरून खोबरे पेरून परता आणि गॅस बंद करा. झाली भाजी तय्यार.

# टिप - हिच भाजी आधी उकडून घेण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे ती मऊ होते. पण डायरेक्ट केली तर जास्त रुचकर व पौष्टीक होते.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : इंटरनेट/मिसळपाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या