श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा राऊत यांच्या निवासस्थानी साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/2026 :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने "श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा सन 2026 महाराष्ट्र परिक्रमा" सुरू आहे. या परिक्रमे अंतर्गत श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकाचे आगमन शुक्रवार दिनांक 5/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता बागेचीवाडी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील कल्याण ज्ञानोबा राऊत यांच्या निवासस्थानी झाले. समस्त राऊत परिवार, उपस्थित भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या धार्मिक वातावरणात स्वागत केले.
पालखी स्थानापन्न होऊन आरती झाली. स्वामींच्या चरण पादुकांचे दर्शन घेऊन राऊत परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला. कल्याण ज्ञानोबा राऊत, विक्रम ज्ञानोबा राऊत, गोपाळ कल्याण राऊत, समीर पांडुरंग राऊत इत्यादी समस्त राऊत परिवाराच्यावतीने स्वामींच्या पालखी दर्शन सोहळ्याचे शिस्तबद्ध नियोजन केले. पंधरा वर्षापासून पर्वत परिवाराच्यावतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव,आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, ॲड.अविनाश टी. काले, तुकाराम निवृत्ती वाघ, यांचे सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या