विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 30/7/2026 :

शालेय जीवनातच आपले व्यक्तिमत्त्व व चारित्र्य घडत असते. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या अंगी नैतिक मूल्ये जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.

नेहमी खरे बोलणे, आज्ञाधारक व प्रामाणिक असणे, वेळेचे महत्त्व जाणणे, स्त्रियांचा आदर करणे, शिस्तीत वागणे, संवेदनशील असणे, दुसऱ्याचे दुःख समजून घेणे, त्यांच्या पडत्या काळात त्यांना धीर व आधार देणे आणि स्वतःचे आरोग्य जपणे... या चांगल्या सवयी लहानपणापासूनच लावून घ्या.

मुलांनो, या गोष्टी फारशा अवघड नाहीत. एकदा असे वागायची सवय लावून घेतली की या गोष्टी सहज अंगवळणी पडतात. त्यामुळे आपोआपच आपण सकारात्मक विचारांकडे वळतो आणि आपले वर्तनही तसेच घडते.

म्हणूनच 'विचार तसा आचार' ठेवा आणि आपल्या जीवनात नीतिमूल्यांची जोपासना करा. सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या