मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/7/2026 :
सुसंस्कृत बोलणे व वागणे ही आजच्या काळाची नितांत गरज झाली आहे. सध्या समाजात बोलताना भाषेचा दर्जा अत्यंत घसरला आहे; कुटुंबात आपापसात संभाषण करतानासुद्धा ते प्रकर्षाने जाणवते.
मित्रांमधील आपापसातील बोलणे असो वा सार्वजनिक ठिकाणी केलेले वक्तव्य असो, सर्वत्र अपशब्द व शिवीगाळ ऐकायला मिळते. सार्वजनिक व संवैधानिक परिभाषासुद्धा आता बदलली आहे. उच्च पदांवरील व्यक्ती जेव्हा अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरतात व त्याचे समर्थन करतात, तेव्हा त्यांची चीड येते.
जागतिक बातम्या वाचताना किंवा ऐकतानासुद्धा हेच जाणवते. एकमेकांना दमदाटी करताना किंवा धमक्या देताना इतरांसमोर आपली प्रतिमा डागाळत आहे, याचेही भान कोणाला राहत नाही.
आजचा संकल्प
_आपण प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर आपली नैतिक मूल्ये जपू आणि इतरांशी संवाद साधताना नेहमी आदरभाव ठेवून नम्रतेने व विनयशीलतेने बोलू; आपल्या भाषेचा दर्जा कायम जपू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या