विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/7/2026 :
आपल्या सर्वांना गोष्टी ऐकायला आवडतात. नकळत्या वयापासून झोपवताना आईने व नंतर आजीने सांगितलेल्या चिऊ-काऊच्या गोष्टींसह सर्व गोष्टी आपल्याला आठवतात. मोठे झालो की आपण गोष्टी वाचायला शिकतो.
त्यांमधून काहींना गोष्टी सांगायला आवडतात. गोष्ट सांगणे ही एक कला आहे; यामधूनच कथाकथन जन्माला आले असावे. काही जण अभिनयासह, आवाजात चढ-उतार करून जेव्हा गोष्ट सांगतात, तेव्हा डोळ्यांपुढे प्रसंग उभे राहतात व नकळत मनावर छाप पडते.
मुलांनो, तुम्ही पण इसापच्या नीतिकथा, प्रवासवर्णने, थोर व्यक्तींची चरित्रवर्णने वाचा. साने गुरुजींच्या कथा आपल्याला खूप महत्त्वाचे मार्गदर्शन करतात; आपल्यातील संवेदनशीलता वाढवण्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.
योग्य वयात योग्य गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या, तर आपले व्यक्तिमत्व सुंदर घडते हे लक्षात घ्या.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या