विचारधारा


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 31/7/2026 :

शालेय जीवनात शाळेत किंवा बाहेर आपण मित्रांशी बोलत असतो, तेव्हा अनेकदा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात; मग आपल्याला खूप राग येतो. अशा वेळी आपण प्रचंड चिडतो किंवा रडू लागतो.

राग आला की आपल्या बोलण्यावर आपला संयम राहत नाही आणि आपण बोलू नयेत अशाही गोष्टी बोलून जातो. अनेकदा समोरील व्यक्तीचे वागणे किंवा बोलणे मनाला खूप दुःख देते आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.

मुलांनो, कोणतीही गोष्ट आधी नीट समजून घेणे व त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे हे कधीही योग्य ठरते. आपल्या मनासारखे काही घडले नाही, म्हणून लगेच अश्रू गाळणे किंवा समोरच्या व्यक्तीवर चिडणे पूर्णपणे अयोग्य आहे.

आपली असहायता दाखवणे किंवा लगेच आक्रमक होणे... या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत; म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संयम व समजूतदारपणा दाखवायला शिका.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या