मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/7/2026 :
पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा जाणवतो. वर्षाविहारासाठी तयारी सुरू होते; डोंगर व धबधबे असणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते. कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराचे ग्रुप नियोजन करून बाहेर पडतात.
ज्येष्ठ नागरिक असतील तर उत्साह बेताचा असतो; पण तरुणाईचा उत्साह मात्र ओसंडून वाहत असतो. रिल्स व सेल्फींचा अतिरेक होतो, क्वचित अपघात होतात आणि अगदी जीवावर बेततात.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. पर्यटनाचा आनंद मिळवण्यासाठी गेल्यावर जर भांडणे आणि मारामारी घडणार असेल, तर समाज कोणत्या दिशेने चालला आहे असा प्रश्न पडतो.
आजचा संकल्प
बाहेर पडल्यावर सार्वजनिक सुरक्षा जपणे, पर्यावरण सांभाळणे आणि स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात न घालणे या गोष्टी पाळू व सुरक्षेची काळजी घेऊन सहलीचा आनंद घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या