बरसू दे पांडुरंगा....!!

 


बरसू दे पांडुरंगा....!!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/07/2026 :

बरसू दे पांडुरंगा, पावसाचं रान,

आषाढीच्या वारीत, अडकला माझा प्राण...

भेगाळलेली भुई, चिंब चिंब कर,

मोत्यांचे अंकुर, येऊ दे रे वर...

तुझ्या नामाचा घुमू दे, टाळ-मृदंगाचा नाद,

पेरणी सरली की पाय धरती, पंढरपूरची वाट...

सुखावलेलं मन, वर्षभराची ही सोय,

विठुराया, तुलाच ठाव माझ्या मनाची गैरसोय...

काळ्या आईची ओटी, धान्याने भरू दे,

वारकऱ्यांच्या ओठी, विठ्ठलनाम झरू दे...

पावसाच्या प्रत्येक सरीत, तुझ्या कृपेचा भास,

चंद्रभागेच्या तिरी लाभो, तुझ्या दर्शनाचा श्वास...

आषाढीची वारी माझी, आनंदात रंगू दे,

सरीवर सरी बरसूनी, बळीराजाला बळ दे...

॥ राम कृष्ण हरी ॥

॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥

==========/==========

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या