वंचित बहुजन आघाडीची उद्या अकलूज बंदची हाक

 


वंचित बहुजन आघाडीची उद्या अकलूज बंदची हाक 

वृत्त एकसत्ता न्यूज

अकलूज दिनांक 22/7/2026 :

NEET परीक्षा पेपर फुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस, सीआरपीएफ जवान यांचे सह पोलीस गणवेश घातलेल्या गुंडांनी केलेल्या अमानुष लाठी चार्ज चा जाहीर निषेध करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार उद्या गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी अकलूज बंदची हाक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेली आहे अशी माहिती  वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आली आहे. तरी नागरिकांनी अकलूज बंदला जाहीर पाठिंबा देऊन बंद यशस्वी करावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या