सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 


सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 21/7/2026 :

सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवीका अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना प्रा. लि. शंकरनगर अकलूज मधील कारखाण्याच्या बोर्ड मिटिंग मध्ये दिनांक १७ जुलै २०२६ रोजी संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

यामध्ये संगणक विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी कु. श्रद्धा शहाजी पेटकर (९३.६५%), मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी चि. गोविंद सदाशिव फुले(८२.४२%), इलेक्ट्रीकॅल विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी चि.आदित्य राजकुमार सालगुडे-पाटील (९३.२२%), सिविल विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी चि. जयराज किशोर भिंगारदिवे (७९%)  तसेच गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आर्टिफिशियल इंटेलिजेंस & मशीन लर्निंग या विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. क्षिती जयकुमार कोतमिरे व श्रुष्टी जयकुमार कोतमिरे या विद्यार्थिनीचा सत्कार कारखान्याच्या बोर्ड मिटिंग मध्ये संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,  महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील (नगरसेवक अकलूज नगरपरिषद) तसेच कारखान्याचे सेक्रेटरी व महाविद्यालयाच्या ट्रस्टचे सचिव   सुहास रघुनाथ यादव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांच्या हस्ते संपन्न झाला. मान्यवरांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या