बाबासाहेब क्षीरसागर यांचा म. गांधी विद्यालय पेनूर येथे सत्कार

 


बाबासाहेब  क्षीरसागर यांचा म. गांधी विद्यालय पेनूर येथे सत्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर यांचा म. गांधी विद्यालय पेनूर येथे प्रकाश कस्तुरे (संस्थापक व मा. पं. स. सदस्य) यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी पेनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब सलगर, भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सरपंच हरीभाऊ चवरे, मान्यवर  नागरिक व हायस्कूल चा सर्व स्टाफ, मुले मुली हजर होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. मेरीट मध्ये आपली मुले येणेसाठी, गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी खूप लक्ष द्यावे लागेल व मुलांनी खूप मनापासून अभ्यास करावा. पालकांनी ही घरी आल्यावर मुलं  एक तासभर अभ्यास करतील असे लक्ष द्यावे. यापुढे व्यवसाय शिक्षण व आदर्श भारतीय संस्कृतीचे अनुकरणाचे धडे शिक्षकांनी  मुलांना द्यावेत. मुलाना स्वावलंबी शिक्षण द्यावे. असे आवाहन बाबासाहेब  क्षीरसागर यांनी याप्रसंगी बोलताना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या