मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/7/2026 :
समाजात वावरताना आपल्याला अनेक बरे-वाईट अनुभव येतात. काही आपल्या मनाला आनंद व समाधान देतात, तर काही अनुभवांनी आपले मन विषण्ण होते.
कुठे चुकीचे काही घडत असते, तर कुठे अन्याय-अत्याचार होत असतात. लोक दुसऱ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलत-वागत असतात, त्यांना त्रास देत असतात. क्वचित जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाहीत.
अशा वेळेस ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांनी कडक व काटक बनले पाहिजे. स्वतःहून कोणाला दुखवायचे नाही; पण आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची ताकद आपल्यात हवी.
आजचा संकल्प
अन्याय करणाऱ्यापेक्षा गुपचूप अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो हे लक्षात घेऊ व आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या