सोनवणे 卐 शिंदे शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/07/2026 :
सौ. रत्नप्रभा व श्री गोकुळ धोंडीबा सोनवणे यांचे नातू व सौ. मनिषा व श्री राजू गोकुळ सोनवणे राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजिंक्य आणि कै. मालन व कै. शंकर बापूजी शिंदे यांची नात व सौ. रुपाली व श्री रविंद्र शंकर शिंदे राहणार बारामती जिल्हा पुणे यांचे कनिष्ठ कन्या चि.सौ.कां दिव्या यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 4/7/2026 रोजी दुपारी 12 वा. 31 मि. या मुहूर्तावर थाटाने संपन्न झाला.
कृष्णप्रिया मल्टी फंक्शनल हॉल अकलूज (बायपास रोड) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वराना शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे सोनवणे आणि शिंदे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या