मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/07/2026 :

अलीकडे आपण अनेकांच्या तोंडी ऐकतो, वेळच मिळत नाही. का बरे असे होते. दिवसाचे २४ तास तर सर्वत्र आहेत. पूर्वी पण तितकेच होते. रविवार सुट्टीचा दिवस.

घरातील कामे म्हणावीत तर पूर्वीसारखी सर्व कामे हाताने करावी लागत नाहीत. यांत्रिकीकरण, स्वयंचलित साधने यामुळे घरातील कामाचा वेळ व कष्ट दोन्ही वाचते. प्रवासाचे पण तेच. किती वेळ वाचतो!

मग हा वाचणारा वेळ जातो कुठे? कोणाला भेटायला वेळ नाही, व्यायाम करण्यासाठी वेळ नाही, अवांतर वाचन नाही, निवांत गप्पा मारायला वेळ नाही, जेवायला सुद्धा वेळ नाही... मग वेळ गेला कुठे?

 आजचा संकल्प

हातातील वेळेचे काटेकोर नियोजन करू. काम, कुटुंब आणि वैयक्तिक आरोग्य यांचे योग्य ते प्राधान्यक्रम ठरवू आणि सर्व गोष्टींना समान न्याय देऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या