श्री हनुमान मंदिर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न


श्री हनुमान मंदिर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/07/ 2026 :

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर व श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवक कल्याणकारी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने श्री हनुमान मंदिर बांधकामाचा भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

  सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी श्री शंकर कारखाना कार्यस्थळी संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व सौ. कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, ससौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील व सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील,  कारखान्याचे संचालक, आजी माझी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिवामृत दूध संघाचे संचालक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक,सूतगिरणीचे संचालक,विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक, सरपंच उपसरपंच व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते कारखान्याचे चेअरमन यांचे हस्ते मंदिर बांधकाम शिल्पकार दिपक  मायाचार्य यांचा सत्कार करण्यात आला ,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल , कारखान्याचे अधिकारी ,कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या