⭕ राहुल गांधी : मुखवटे आणि चेहरे, भाग -१
💢 राहुल गांधीचे परदेश दौरे ! नक्की कोणासाठी? कशासाठी?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/07/ 2026 : काँग्रेस पक्षासाठी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौरे हा टीकेचा विषय असतो. २०१४ ते २०२४ या काळात एकूण मोदींनी एकूण ७७ विदेश दौरे केले. विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग, अनेक देशांशी भारताचे संबंध दृढ करणे अशा कामांसाठी मोदींचे हे परदेश दौरे होते.
याउलट २०१५-२०१९ या काळात राहुल गांधीने २४७ परदेश दौरे केले. याच काळात सोनिया गांधी यांनी अज्ञात ठिकाणी २७ परदेश दौरे केले. या दोघांनाही एसपीजीचे संरक्षण कवच दिले जाते. पण या मायलेकांनी, विशेषतः राहुल गांधीने आपल्या परदेश वारीबद्दल एसपीजीला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवण्याचे प्रकार केले. त्यामागचा हेतू काय असावा?
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील कॅान्ग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर, २०१५ मध्ये राहुल गांधी ६० दिवसांसाठी दक्षिणपूर्व आशियाला गेले. त्यांच्या परदेश वारीचा सर्वात महत्त्वाचा भाग दोन चीनधार्जिण्या देशांमध्ये (म्यानमार – २१ दिवस आणि कंबोडिया – ११ दिवस) त्यांनी व्यतित केला.
कधी युनायटेड किंग्डम ( इंग्लंड, स्कॅाटलंड,वेल्श, उत्तर आयर्लंड असा समूह देश), अमेरिका,इटली , थायलंड या देशांच्या अनेक फेऱ्या त्यांनी केल्या. सतत भारतविरोधी भुमिका घेणारया तुर्कस्तान या देशातही ते गेले. या सर्व परदेश भेटींचा तपशील कधीच बाहेर आला नाही.
राहुल गांधीनी गेल्या दहा वर्षात शेकडो परदेशयात्रा केल्या. इंग्लड, अमेरिका, इटली, फ्रान्स, नॅार्वे, बेल्जियम, थायलंड, चीनव्याप्त तिबेट, म्यानमार, कंबोडिया, उझबेकीस्तान या व्यतिरिक्त किती देशात गेले असावेत याची नोंद नाही. येथे त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतले. पण हे सर्व खुले मेळावे नव्हते, तर बंद दाराआड विशेष निमंत्रीत लोकांबरोबर केलेल्या बैठका होत्या.
या प्रत्येक भेटीनंतर जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशातील माध्यमांमध्ये भारत विरोधी अपप्रचार करणारे लेख लिहिले गेले. भारतातील लोकशाही संपली आहे, येथे मुस्लिमांचा नरसंहार होतो आहे, जातीयवादी दंगली होत आहेत, येथील निवडणुक मुक्त आणि निष्पक्ष नसल्याने लोकशाही धोक्यात आली आहे अशा आशयाचे लेख लिहिले गेले. मोदी एक हुकुमशहा आहेत, येथील अब्जाधीश निरंकुश आहेत, मोदी खोटारडे आहेत, भारतात असहिष्णुता वाढली आहे असा प्रचार करणारे लेख त्यात होते. लंडन टाईम्स, युके गार्डियन, न्युयार्क टाईम्स, फायनांशियल टाईम्स, टाईम मासिक, ब्लुमबर्ग, जेकोबिन अशा प्रसिध्द माध्यमातून भारतविरोधी राळ ओकली गेली. राहुलच्या २०२३ च्या युके भेटीनंतर बीबीसीने २००२ गुजरात दंगलीचा संदर्भ घेऊन डॅाक्युमेंटरी काढली.
आताच बांगला देश मध्ये हिंस्र आंदोलन झाले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शेख हसिना यांना देशातून पळून जावे लागले, तेथे हिंदूंवर अत्याचार सुरु आहेत. या बंडाळीसाठी सीआयए, जॅार्ज सोरोस यांनी बांगला देश नॅशनल पार्टी (बीएनपी) आणि जमाते इस्लामीला मदत केली असे म्हंटले जाते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी लंडनला गेले होते. तेथे ते बीएनपी चे नेते तारीक रहमान यांना भेटले असा आरोप बांगला देशी पत्रकाराने केला आहे. का झाली ही भेट?
राहुल गांधींचे हे परदेश दौरे नक्की कोणत्या उद्देशाने असतात? ते भारत विरोधी जॅार्ज सोरोसच्या लोकांना भेटतात का? कॅान्ग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर याने पाकिस्तान मध्ये जाऊन मोदींना हरवण्यास मदतीचे आवाहन केले होते ते लोकांना आठवत असेलच. राहुल गांधी सत्ता मिळवण्यासाठी ते परदेशी मदत घेत आहेत का?
प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाने हा प्रश्न राहुल गांधीना विचारायलाच हवा.
भूषण मर्दे
#RahulGandhi #AntiHinduRahulGandhi #TraitorRahulGandhi

0 टिप्पण्या