विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 22/7/2026 :

अभ्यास करताना मध्येच कोणी 'डिस्टर्ब' करू नये, लिंक तुटते, असे वाटत असते. आपण लेखन, वाचन किंवा पाठांतर करत असलो तरी त्यामध्ये सलगता असावी असे वाटणे गैर नाही.

मात्र आपण स्वतः तरी सलग अभ्यासात मग्न होऊ शकतो का? डोळ्यांपुढे पुस्तक असले व नजर पुस्तकात असली, तरी मन इकडे-तिकडे फिरत असते. मित्र खेळायला बोलावतात, तसा मोबाईलही खुणावत असतो; मनात काही वेगळेच विचार चालू असतात.

मुलांनो, अभ्यासाला बसलात तर मन लावून अभ्यासच करा. मन वर्तमानकाळात ठेवा. अभ्यास पूर्ण झाल्यावर मित्रांना वेळ द्या; थोडा वेळ मोबाईल घ्या किंवा दूरदर्शन पाहा.एका वेळेस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.

अभ्यासाला जास्त वेळ व जास्त महत्त्व द्या.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या