विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/07/2026 :
आपण आपले आरोग्य जपावे असे प्रत्येकजण सांगते. त्यासाठी आई पौष्टिक जेवण खाऊ घालते. वडील त्यासाठी लागणारे सामान आणतात. तरीही आपल्याला आईच्या हातचे, स्वच्छता ठेवून केलेल्या स्वयंपाकापेक्षा बाहेरचे, उघड्यावरील पदार्थ खायला आवडतात.
गाडीवर, तळून तळून काळ्या पडलेल्या तेलात तळलेले, अस्वच्छ जागेतील, वर्तमानपत्राच्या कागदावरील वडापाव, भजी, भेळ छान लागते ना? तितक्याच पैशात घरी केले तर सर्वांना पुरेल इतके होते, शिवाय स्वच्छ, पौष्टिक आणि आरोग्यदायी.
मुलांनो, तुम्हाला हे कधी समजणार? बाहेरच्या अन्नात भेसळ किती असते ते माहित आहे का? तेलाची प्रत, चटणी असो किंवा पीठ प्रत्येक जिन्नसमध्ये काही ना काही मिसळलेले असते. खाताना बरे वाटते पण पोटात गेल्यावर त्रासदायक होते.
बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळा व स्वतःचे आरोग्य जपा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या