गिरमे 卐 नाळे शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/07/2026 :
कै वसंतराव कृष्णाजी गिरमे यांचा नातू व सौ सविता व श्री प्रवीण वसंतराव गिरमे राहणार संग्रामनगर- अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे सुपुत्र चि. श्रीयश आणि कै. विठ्ठलराव सदाशिव नाळे यांची नात व श्री दत्तात्रय विठ्ठल नाळे राहणार गट नंबर 2 माळीनगर, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची सुकन्या चि. सौ. कां. पूजा यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार दिनांक 07/07/2026 रोजी दुपारी 12 वा. 31 मि. या शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.
सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर पेट्रोल पंपा समोर, माळीनगर येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवराना शुभाशीर्वाद दिले.
याप्रसंगी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे आणि संचालक मंडळातील सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे गिरमे आणि नाळे परिवाराच्यावतीने स्वागत सन्मान करण्यात आला.

0 टिप्पण्या