मा.आ.बबनदादा शिंदे यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होणार.... 🟣 विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन... 🟠 बबन दादा शिंदे ऑगस्ट अखेर मायदेशी येणार.... रणजीतसिंह शिंदे


मा.आ.बबनदादा शिंदे यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होणार....  

🟣 विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन...

🟠 बबन दादा शिंदे ऑगस्ट अखेर मायदेशी येणार....

  रणजीतसिंह शिंदे 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

बेंबळे /प्रतिनिधी दि.13/7/2026 : माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा 75 वा वाढदिवस 'अमृत महोत्सवी वर्ष' म्हणून साजरा करण्यात येणार असून वर्षभर विविध समाजहितोपयोगी असे अनेक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांनी दिली आहे .



 1 सप्टेंबर 26 रोजी बबन दादा शिंदे यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होणार आहे ,त्यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालया मध्ये माढा तालुका व विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर (42 गावे) व माळशिरस (14 गावे) तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आयोजित भव्य मेळाव्याप्रसंगी रणजीत सिंह शिंदे माहिती देत होते. याप्रसंगी तालुक्याचे माजी सभापती विक्रम दादा शिंदे, समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे,  डॉक्टर जयंत करंदीकर, अण्णासाहेब ढाणे, अशोक लुणावत, प्रा. दळवी ,मधुकर पाटील, झुंजार भांगे, संजय टोणपे, गोरख देशमुख, मुन्नाराजे मोरे, अनिल देशमुख, बाळासाहेब कोठारी, बंडूनाना ढवळे, संजय पाटील भिमानगरकर, वैभव मोरे, बिभीषण डांगे ,रमेशकाका पाटील ,संभाजी पाटील, दिगंबर माळी ,अप्पासाहेब उबाळे, भाऊसाहेब भांगे ,राहुल खटके, विक्रम ताटे, तात्यासाहेब तरंगे, मनीषाताई गिड्डे, हनुमंत पाटोळे, शब्बीर जागीरदार, दिनेश गाडेकर, कृष्णात खटके, अंकुश वाघ, सुदर्शन मिसाळ, शिवाजी रेडे ,राहुल टिक, राहुल रेडे, प्रशांत नवगिरे, नितीन झाडबुके, बापू परबत, नीलकंठ पाटील, रामभाऊ शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .

 अधिक माहिती देताना रणजीतसिंह शिंदे म्हणाले की मागील वर्षी बबन दादा शिंदे यांचेवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी 12 जून रोजी आम्ही अमेरिकेत सेंट लुइस शहरातील सी जे बी हॉस्पिटलमध्ये गेलो व 18 ऑगस्ट 25 रोजी दादांच्यावर ही शस्त्रक्रिया तेथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अमोल पावले (जे मूळचे टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत) यांनी यशस्वीरित्या पार पाडली व मागील एक वर्षापासून दादा येथेच उपचार घेत आहेत, परंतु आता  तब्येतीत खूपच सुधारणा झाली असून 14 महिन्यानंतर 25 ते 30 ऑगस्ट 26 पर्यंत बबन दादा शिंदे परत मायदेशी येणार आहेत.  यावेळेस सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे, परंतु त्यांना भेटण्याप्रसंगी काही नियमांचे सर्वांनाच काटेकोरपणे व शिस्तीत पालन करावे लागणार आहे. पुढील अमृत महोत्सवी वर्षात गावोगावी बबनदादांचे स्वतंत्र गाव भेट दौरे आयोजित करण्यात येणार आहेत ,उद्देश हाच की गावातील प्रत्येक नागरिकास दादांची भेट घेऊन बोलता यावे व गप्पागोष्टी चर्चा करता याव्यात. एक सप्टेंबर 26 पासून गावोगावी कार्यकर्त्यांनी आदरणीय बबनदादांनी केलेल्या कार्याच्या माहितीचे डिजिटल बोर्ड लावावेत तसेच मोठे फ्लेक्स लावून त्यावरती महिला कार्यकर्त्यांना विशेष प्राधान्य द्यावे, प्रत्येक गावातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचा सन्मान  करण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक गावात 75 झाडे लावण्यात येऊन ती पुढील पाच वर्ष जगवण्यात येणार आहेत, युवकांच्यासाठी युवा महोत्सव भरवण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, महिलांसाठी गावोगावी विविध कार्यक्रम घेतले जातील, ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी साठी कीर्तनाचे, प्रवचनाचे  सोहळे आयोजित केले जातील, सोशल मीडियावर रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात येतील, शाळांमधून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रम आयोजित केले जातील , आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिर ,संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, महिलासाठी स्वतंत्र आरोग्य  शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. क्रीडा स्पर्धा मध्ये बैलगाडा शर्यती क्रिकेटच्या स्पर्धा व इतर काही खेळांच्या स्पर्धांचे ही आयोजन केले जाईल, तसेच सामान्य नागरिकांना आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे मिळण्यासाठी गावोगावी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मेळावे घेतले जातील, त्याचप्रमाणे संपूर्ण  वर्षांमध्ये ऐन वेळेस काही नाविन्यपूर्ण उपक्रमाचेही आयोजन करण्यात येईल तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी विषय समित्यांची स्थापना करून कामे केली जातील असे रणजीतसिंह शिंदे यांनी  यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. जयंत करंदीकर, शिवाजी कांबळे, बंडूनाना ढवळे, आप्पा ढाणे, संतोष  अनभूले, संतोष शिंदे, जितेंद्र गायकवाड, आप्पा पाटील, सुजित भोसले, लक्ष्मण शेळके, हनुमंत चव्हाण आदी मान्यवरांनी आपले समयोचित विचार व्यक्त केले.

       या कार्यक्रमास माढा विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत सदस्य, नगरपरिषदांचे नगरसेवक, कारखान्यांचे संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, माढेश्वरी बँकेचे संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील गावोगावचे आजी माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ, युवक, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . अकोले खुर्द चे युवक कार्यकर्ते  दीपकमामा पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची भूमिका विशद केली , राजेंद्र मुळे आणि सचिन होदाडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कैलास तोडकरी यांनी मानले.

....."सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे परंतु उजनी धरण 51 टक्के भरले असून त्यामध्ये 90 टीएमसी पाणी साठा झालेला आहे त्यामुळे सर्व  स्रोतांतून  शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी  पालकमंत्री ना.गोरे यांची उद्या कार्यकर्त्यासमवेत मुंबईत भेट घेत आहे .सध्या सीनामाढा सिंचन योजनेची दुरुस्ती चालू आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेतून तीन गावांना पाणी मिळणार आहे, आष्टी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार आहे".  - रणजीतसिंह शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या