🏤 कामाठीपुरा 🏤 प्रकरण:- 0️⃣2️⃣


🏤 कामाठीपुरा 🏤 प्रकरण:- 0️⃣2️⃣

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 30/7/2026 :

*पब्लिक बाहेरून शिव्यांचा भडीमार करायचे*. कुणाला पडलेय. गाजून इकडे आलेल्या सिनेमांना इथे भारी डीमांड हाउस फुलचा बोर्ड लागल्याबरोबर बाहेर ब्लॅकवाले हातात तिकिटांचा गठ्ठा घेऊन उभे राहायचे. एक रुपया पाच पैसेवाले तिकीट दोन रुपये ह्या दराने विकले जायचे. ज्याला घ्यायचं आहे तो घेई. समजदार माणूस वाट बघे. जसजसा वेळ सरे ब्लॅकवाले तिकिटाचा रेट हलका करीत. इंटरवलला तर अर्ध्या किमतीत तिकीट विकलं जाई.*

ह्या थेटरात बायका येत नसत. अपवाद एखादा तेलुगु फेमस सिनेमा लागला तर, नाही तर इथे तृतीयपंथियांची गर्दी असायची आपापल्या पार्टनर सोबत.

विशिष्ट शोला सिनेमा चालू असताना मध्येच ब्ल्यू फिल्म लावली जायची.

अॅलेक्झांड्रा थेटरात सिनेमा बघायला जाताना फार काळजी घ्यावी लागायची. पाय घसरून पडायची दाट शक्यता. मुठ्या मारून पाडलेला चिक केव्हा जीव घेईल ह्याचा नेम नाही.

तर नवव्या गल्लीतून बाहेर पडलं की सुखलाजी स्ट्रीट. 

सुखलाजी स्ट्रीट म्हणजे मुजयासाठी प्रसिद्ध असलेलं लखनवी ठिकाण. तिथे देहाची भूक शमली की बाजूलाच आतड्याची भूक शमविणारी फेमस बच्चू भायची वाडी. सिक पराठा मस्त मिळायचा इथे.

इथं दिवसा गच्च झोपलेली खिडकीची तावदानं संध्याकाळी सातच्या सुमारास लख्ख डोळे उघडीत.

‘सलामे इश्क मेरी जां जरा कुबूल कर लो' किंवा 'इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा' सारख्या स्वरांसोबत घुंगुरांची थिरकन आणि तबल्याचा ठेका बाहेरच्या रहदारीला झुमवू लागायचा.

नट्यांनाही लाजवतील अशा सौंदर्य? साम्राज्ञी आपल्या खाला, मौसी, हिजडा, भडवा असल्या लवाजम्यासकट आभाळातून अप्सरा उतराव्यात तशा रस्त्यावर अवतरायच्या. 

व्हीटी स्टेशनाकडून येणाऱ्या पासष्ट आणि एकोणसत्तर बसमधल्या अपर डेकवरच्या प्रवाशांसाठी तर ही खास नाईट टूर असायची. बसच्या वरच्या मजल्यावरून ह्या गल्लीतल्या प्रत्येक माडीवर चाललेला मुजरा स्पष्ट दिसायचा. ट्राफिक खोळंबल्यामुळे बस थांबत थांबत जायची.

अकरावी, बारावी आणि चौदावी गल्लींच्या नाक्यावरील निओन साईनच्या प्रकाशात चमकणारे नंबरी बंगले म्हणजे लायसन्स असलेले एक किंवा दोन माळ्यांचे रेड कार्पेट अंथरलेले रंगमहालच जणू. 

गुबगुबीत सोफासेट अन् सुंदर नक्षीकाम तथा अप्रतिम पेंटिंगने सजलेला भव्य दिवाणखाना, तिथे तोकड्या कपड्यात, गोऱ्या गुबगुबीत मांड्या आणि गुलाबी ओठातून एखादा सोनेरी दात दाखवीत हसणाऱ्या नेपाळी ललना तसेच सावळ्या नितळ कांतीच्या, कुरळ्या लांब केसांच्या झुपकेदार गजरा माळलेल्या अन् कपाळावर गंध लावून, सुंदर साडीत स्वतःला लपेटून गि-हाईकाला रिझवणाऱ्या, टपोऱ्या डोळ्यात काजळ ल्यालेल्या दक्षिणात्य सुंदरींचा ताफा असलेला कॉस्टली रंडीखाना.

माडीवर जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेली शिडी. शिडीच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या सफारी सुटात कडक पोजमध्ये उभे असलेले गार्ड कम भडवे. ह्या गार्डच्या हातात दहा रुपयाची नोट चिटकवली की तुम्ही स्वर्गाची पायरी चढायला मोकळे.

बंगल्यात असलेल्या गोऱ्या गोमट्या, नितळ अंगाच्या सुंदर ललना आपल्या नितंब आणि वक्षस्थळांचं उन्मत्त प्रदर्शन करून गि-हाईकाला बियरची बाटली, बिर्याणी आणि अंगाच्या भाड्याच्या वसुलीसकट इथे झोपायला भाग पाडणारच. 

पाचेकशे रुपयाला फुटायचा गिऱ्हाईक इथे. एकूण मामला महागच पण मुजऱ्यापेक्षा स्वस्तच.

मुजऱ्याची तर बातच न्यारी. त्याचा अंदाज आगळा.

पारंपरिक वेशातल्या सौंदर्यवतीचं नृत्य, सोबतीला उंची शराब, हुक्क्याचा कश, बेगमच्या मुखातून निघणारी, हृदयाचा ठोका चुकवणारी ठुमरी, अगदी जिवंत स्वर्गीय अनुभव.

एकदम नवाबी रुबाब. अगदी 'पाकिजा' सारखं लखनवी वातावरण नसलं तरी त्याला प्रामाणिकपणे कॉपी करण्याचा हेतू. पारंपरिक साज, गाद्या - गिरद्या, टेकायला लोड. शराबही दिली जायची ती किमती सुरईमधून काचेच्या नक्षीदार पेल्यात. सोबतीला काजू, पिस्ता, बदामाने तुडूंब भरलेलं ड्राय फ्रुट्सचं ताट. चांदीच्या परातीत मांडलेला, चांदीच्या वर्खात लपेटलेला लवंग खोचलेला हिरवाजर्द विडा. 

इशाऱ्यासरशी एखादी मदनिका तो ताटातला पाचुविडा 'खाविंद' च्या मुखात अलवार सरकवायची. बदल्यात दहा-दहाच्या पाच-सहा नोटा तिच्या हातात कोंबल्या जायच्या. एक पान पन्नास-साठ रुपयाला पडायचं.

प्रत्येक थुंकीगणिक बदलणारी गुलाब पाण्याची नक्षीदार पिंकदाणी. दर्दीच्या मणगटात टपोऱ्या मोगऱ्याचा धुंद करणार गजरा. मिनिटा मिनिटाला शिंपडलं जाणारं सुवासिक अत्तर.

इथे येताना लखनौसारख्या पारंपरिक पेहेरावाचं कंपल्शन नव्हतं. मुजरा बघायला आलेल्या शेटच्या चमच्याच्या हातातील ब्रीफकेसवरून दर्दीचं मोल जाणलं जाऊन त्याला आत शिरण्यास वाट मोकळी करून दिली जात असे. अन्यथा कोई भी परिंदा अंदर पर नही मार सकता था.

दर्दी पण आलतू फालतू नसायचे. स्मगलर, काळाबाजार करणारे धन्ना सेठ, बिल्डर, मिनिस्टर, शासकीय कमिशनर लेवलचे अधिकारी, पुचाट समाजात मोठा मानमरातब असणाऱ्या मोठमोठाल्या माणसांची जहागीर होती मुजरा गल्ली.

इथे जोहराबाई, गौहर सुलताना, हमिदाजान, रुखसाना बेगमच्या मेहंदी रचलेल्या, घुंगरू बांधलेल्या पावलांशी नोटांचा खच पंडायचा तोच मुळी सुरुवातीच्या ठुमरीच्या आलापीवर. नंतर त्यांच्यावर नोटा ओवाळल्या जायच्या त्यात तर स्पर्धाच होती. हजारोंची एक रात्र असायची.

नथनी उतरवायची बोली लागायची.

लहानपणी पळवून आणलेल्या 'तिला' खाऊन, खिलवून तिची जवानी रसरशीत करून न्हाणं आल्याबरोबर सजवून, अफिमचे सरबत पाजून, पन्नाससाठ हजार रुपयाच्या बदल्यात फेकलं जायचं एखाद्या ढेरपोट्या, लिंगाची क्षमता संपलेल्या ओबडधोबड श्वापदापुढे.

आती ती प्रॉडक्ट झालेली असायची. सुरवाती पासून त्याच जगात राहिल्यामुळे ‘अपना भी हश्र कुछ अलग नहीं गालीब' ह्याची तिला पुरेपूर जाणीव होती. नथनी उतरवण्या अगोदर तिच्यावर धारधार वॉच असायचा. तिला कुणावर जीव बसवणं पाप होतं. तिला शिक्षण घेणं पाप होतं. हातात घेतलेल्या नोटेचा काय व्हॉल्यू आहे ह्याची कल्पना नव्हतीच तिला कधी. घर, नाचणं, जेवण, प्रक्षालन एवढाच तिचा दिनक्रम. खिडकीमधून खाली खेळणाऱ्या मुलांना बघून खुश व्हायची ती...

तिच्या मैत्रिणी वेगळ्या असायच्या.

'उफ्फ.. बहोत तकलीफ दि हरामीने... सामान तो काम कर नही रहा था बुढे का और चोदने चला था ... ये रख' पैसे अम्मीच्या तोंडावर फेकून रेशमाजान म्हणाली.

हे सगळं ऐकायची ती बिचारी अन् रेश्मा दीदी, लक्ष्मी ताई, फातिमा आपा ह्यांच्या सारख्या आपण कशी बनू ह्या स्वप्नांवर ती रुंजायची. छान छान कपडे, शू वेयर, कॉस्मेटिक अन दागिने स्वतःच्या कमाईचे कसे असतील ह्या गणितात गुम व्हायची...

अन मग तो दिवस यायचा...

सज सवरकर जेव्हा ती फुलं माळलेल्या शेजेवर बसायची वाट बघत तिच्या पार्टनरची तेव्हा एका तासाच्या प्रतीक्षेनंतर गप्पकन दरवाजा ओपन व्हायचा. तिची अम्मा एका ढेरेढार, अर्ध टक्कल असलेल्या, तोंडात पानाचा तोबरा भरलेल्या वय वर्ष पंचावन्न ते सत्तावन्न असलेल्या व्यक्ती सकट प्रकट होत म्हणायची ‘हुजूर... जी जान से पाली हुई बेटी आपके हवाले कर रही हूं.'

हपापलेला धन्ना शेठ वेळ न दवडता बेडवर पहुडलेल्या सुंदरतेवर स्वार होतो... त्याच्या तंबाखू आणि दारू मिश्रित ओकारी येणाऱ्या वासाने हिचा जीव गुदमरतो. त्याचं अवाढव्य घामेजलेलं धूड हिचा नाजूक, पातळ देह व्यापून टाकतो. ओरबड ओरबड ओरबडून दाबून पिळून चाटून, चावून तीच्या देहाला होणारी यातना ती सहन करते. 

अफिमच्या नशेत असली तरी तिला ह्या बलात्काराची जाणीव झालेली असते. आता ती स्वत:ला यातून सोडवू पाहते. छोट्याश्या झटापटीत ती स्वतःला सोडवण्यात यशस्वी पण होते. धावत जाऊन खोलीचा दरवाजा उघडते तोच दरवाज्यात तिची अम्मी दोन पैलवाना सकट सामोरी येते. तिला बेटी बेटी बोलून स्त्री धर्माचा वास्ता देऊन पुन्हा प्रेमाने आत धाडू पाहते. हि नाही नाही म्हणते मग नाईलाजाने अम्मीला पुन्हा तो सरबताचा ग्लास बळजबरीने तिला पाजावा लागतो. आता तिला ग्लानी यायला लागते. पुन्हा दोन बायका येऊन तिच्या बखोटीला पकडून त्या शय्येकडे तिला खेचत नेऊन त्या विकृत हसत असलेल्या पैशेवाल्या सैतानाच्या पुढ्यात ढकलून देतात.

आता तिला ग्लानी येऊन तिच्या पापण्या जड झालेल्या असतात. आपल्या शरीराशी चाललेल्या चाळ्याशी तिला काही घेणं देणं नसतं. तिचे कपडे उतरवले जातात. हजारो रुपये क्याश दिलेला शेठ पै अन पै वसूल करायची कोशिश करतो. इंच भर लटकणारं, वाळलेलं लिंग तो तिच्या उघड्या शरीरावर सैरवैर फिरवून हलवून हलवून उत्तेजित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. शेवटी वैतागून स्वतःला शिव्या घालत ढकलत तो दारू ठेवलेल्या टेबलापाशी पोहोचतो. बाटलीचं बुच उघडून ती कच्चीच तोंडाला लावतो. पुन्हा तारवटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत आणखीन दोन घोट घेवून बेडपाशी येतो. पुन्हा तिच्या वक्षांशी, पोटाशी, ओठांशी प्रत्येक अवयवांशी चाळे करत तिला जागं करण्याची कोशिश करतो. ती जडावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते नि पुन्हा झोपेत लीन होते. आता ह्या शेठला गरगरायला लागतं. तो उठण्याचा प्रयत्न करतो पण दारूचा अंमल त्याला फारशी साथ देत नाही. धाडकन तो तिच्या बाजूला आडवा होतो.

पहाटे तिला थोडी जाग येते. डोळे उघडते. दचकून उठून बसते. निर्वस्त्र असलेली ती अस्ताव्यस्त पडलेले कपडे भराभर अंगावर चढवते. बाजूला बघते तर तो राक्षस झोपलेला.

शुद्धीवर आलेली ती झपकन दरवाजा उघडून बाजूच्या खोलीत अम्मी जवळ पोहोचते. झोपलेल्या अम्मीच्या पायाजवळ बसून ओढणी तोंडाशी धरून रडू लागते. अम्मीला जाग आलेली असते. अम्मी तिला छाती जवळ धरते. अम्मीला रडू फुटत नाही पण अम्मी तिला हळूच छाती जवळून बाजूला सारून आपल्या मांडीवर घेऊन थोपटते. आता तिला आश्वस्त छान झोप लागलेली असते.

अम्मीला शेठ कढून पैसे मिळाले असतात. त्याने तिला भोगली नाही भोगली हा त्याचा प्रश्न असतो. शेठ सकाळी आपल्या गाडीत बसून गुपचूप सटकणार. तेव्हा अम्मीला चिंता नसते.

भोवनी झालेली असते.

आता अम्मी निर्धार करते हिला चांगल्या गबरू जवान गिर्हाईकाच्या ताटात भिरकंवायचा.

तसंच होतं.

असंच काहीसं नशिबी असायचं बहुतेक मुलींच्या.

ह्या सगळ्यातून तावून सुलाखून ती पुन्हा नांदती होते कुठली तरी 'जान' होऊन. कोठ्यावर नाचती होते. आपल्या मालकिणीला पैसा मिळवून देण्यासाठी, बदल्यात तिला मिळते दो वक्त कि रोटी आणि सर ढकने के लिए छप्पर.

तीचं प्रॉडक्ट होतं. त्यावर अम्मी, आपा, खाला, भडवे, हिजडे ह्या सगळ्यांची पोटं अवलंबून असतात.

✍️सुधीर जाधव

💠 पुढे क्रमश..... प्रकरण ०३🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या