li.संवाद.il

 

li.संवाद.il

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/06/2026 :

*संवाद..

*संवाद कुठे हरवले.?

*इकडे तिकडे शोधून पाहिले,

*नाही कुठे सापडले.

*अरेच्चा..

*हे तर मोबाईल मधे जाऊन बसले,

*बोटांना काम मिळाले,

*तोंडाचे काम कमी झाले,

*शब्द मुके झाले,

*मोबाईल मधे लपून बसले,

*'हाय' करायला मोबाई,

*'बाय' करायला मोबाईल,

*GM करायला मोबाईल,

*GN करायला मोबाईल,

*शुभेच्छांसाठी मोबाईल,

*भावपूर्ण श्रद्धांजली' साठीही मोबाईल,

*खरेदीसाठी मोबाईल,

*विक्रिसाठी मोबाईल,

*नाटक, सिनेमांची तिकिटं मोबाईलवर,,

*बस, ट्रेन, विमानाची तिकिटं मोबाईलवर,,

*शाळा, कॉलेजची फी मोबाईलवल,

*डॉक्टरांची फी मोबाईलवर,

वेळंच नाही येत आता दुस-यांशी बोलण्याची, बोलता बोलता चेह-यावरचे भाव टिपण्याची,

वेगवेगळ्या 'इमोजी' धावून येतात मदतीला, दूधाची तहान ताकावर भागवायला.?

आता शब्द कानांना सुखावत नाहीत,

आता शब्द ओठांवर येत नाहीत,

आता शब्द कोणी जपून ठेवत नाही,

आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही.?

मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही,

प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही,

आभासी जगातले संवादही आभासी,

अशा संवादांचा आनंद नाही मनाशी.?या आभासी संवादांना मूर्त रूप कधी मिळेल का.? नक्की सांगा माणूस खरंच ह्रुदयापासुन संवाद साधेल का.?   

प्रा. एस. एम. पाटील 

देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

 संकलन : प्रविण सरवदे, कराड,

   ꧁꧂🥳꧁꧂

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या