रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/06/2026 :
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
योग प्रशिक्षक डॉ. सचिन जठार (नातेपुते) यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून जीवन जगण्याची एक कला आहे. योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समन्वय साधला जातो. नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक शांतता मिळते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते.
आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे. योगामुळे शरीरातील विविध अवयवांचे कार्य सुरळीत राहते, रोगांपासून संरक्षण मिळते आणि मन प्रसन्न राहते. प्राणायामामुळे श्वसनक्रिया सुधारते, तर ध्यानामुळे मनाची एकाग्रता वाढते.
विद्यार्थ्यांसाठी योग अत्यंत लाभदायक आहे. योगामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढते. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते.
जागतिक स्तरावर योगाला मान्यता मिळाली असून दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग हा निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवनाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे ही काळाची गरज आहे.
"योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम; योग म्हणजे निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाचा मंत्र."हे त्यांनी सांगितले. . यावेळी योग प्रशिक्षणासाठी
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, संस्थेचे संचालक रामदास कर्णे, सुरेश धाईंजे,सपत्नीक सागर दोशी तसेच इतर मान्यवर शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या