मनाची शुद्धता

 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

 संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 06/06/2026 :

आपले मानसिक आरोग्य जपणे हे पूर्णपणे आपल्या स्वतःच्या हातात असते. आपले मन जर स्थिर असेल, तर आपण वेगवेगळ्या प्रकारची आव्हानात्मक कार्ये सहज करू शकतो; यामुळे आपला आत्मविश्वास देखील नेहमी उत्तम राहतो.

जी व्यक्ती आहे त्या परिस्थितीत आनंदाने समाधानी राहू शकते, कोणालाही नाहक दोष देत नाही, आपल्या अपयशाचे खापर इतरांवर न फोडता स्वतःमधील त्रुटी शोधून काढते आणि कोणत्याही घटनेकडे कायम सकारात्मक दृष्टीने पाहते; खऱ्या अर्थाने त्याच व्यक्तीचे मानसिक आरोग्य संतुलित असते.

अशा व्यक्ती स्वतः मनातून समाधानी असतात आणि आपल्या वागण्यामुळे इतरांचे मानसिक आरोग्य कधीही खराब करत नाहीत. राग, लोभ, मोह, मत्सर यांच्या विळख्यात न अडकता, त्या अतिशय साध्या व सरळ मार्गाने आपले जीवन जगतात. अशा व्यक्तींची ना कोणाशी स्पर्धा असते, ना कोणाबद्दल इर्षा!

आजचा संकल्प 

आपल्या वाट्याला आलेले जीवन, कोणालाही दोष न देता आहे तसे आनंदाने स्वीकारूया. मनात नकारात्मक विचारांची संख्या वाढवून स्वतःचे मानसिक आरोग्य दूषित करण्यापेक्षा, सकारात्मक राहून त्यामधून योग्य मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या