" परमात्म्याचे नाम चिंतन हेच साराचे ही अंतिम सार आहे"- ह.भ.प. कान्होबा महाराज देहुकर

" परमात्म्याचे नाम चिंतन हेच साराचे ही अंतिम सार आहे"- 

 ह.भ.प. कान्होबा महाराज देहुकर

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

 भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 05/06/2026 : " परमात्म्याचे नाम चिंतन हेच साराचे ही अंतिम सार आहे" असे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कान्होबा महाराज देहुकर (देहूकर महाराज फड पंढरपूर) यांनी श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे (तालुका बारामती जिल्हा पुणे) येथे म्हटले.

श्री सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे अधिकमास तपापूर्ती निमित्त सोमवार दिनांक 1 जून 2026 पासून सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मधील  किर्तन मालेतील पाचवे पुष्पगुंफताना ते व्यक्त झाले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हेच नामकार झाले. पाचही जन्मामध्ये त्यांनी त्या त्या अवतारातील त्या त्या "परमात्म्याचे" नाम चिंतनच केले म्हणून ते नामकार झाले. आणि आपण ह. भ. प. झालो. "वाचे बोला पुरुषोत्तम". "जे सत्य आहे तेच सार आहे, जे भ्रामक आहे ते असार आहे". संतांनी ही नामाला सार म्हटले आहे. जगाचा विचार केला तर जग हे सार आणि असारा च मिश्रण आहे. हे विविध उदाहरणांनी पटवून देताना "आपल्याला काहीच कळत नाही" हेच आपल्याला कळत नाही. थोडक्यात ऐकली पोथी, वळल्या वाती आणि झाली माती अशी आपली अवस्था असल्याचे कटू सत्य त्यांनी विविध दाखल्यांसह विशद केले.

या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे मार्गदर्शक ह भ प गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे (श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक, आळंदी), प्रेरणास्थान  व्यासपीठ चालक ह भ प दत्तात्रय महाराज फरांदे (निंबुत) हे आहेत. किर्तन सेवेनंतर कीर्तनकार ह भ प आकाश महाराज जगताप (चोपडज) यांचे दोन्ही सुपुत्र प्रथमेश आणि प्रेम यांचा "बाल वारकरी" म्हणून ह.भ.प. कान्होबा महाराज देहुकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संपूर्ण सात दिवस चहापान खर्च बाळकृष्ण शंकरराव खलाटे राहणार खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा, हार फुले प्रकाश सर्जेराव मोकाशी करंजे, जार पाणी व्यवस्था एवं वॉटर सप्लाय करंजे प्रोप्रायटर तेजेस मंगेश गायकवाड करंजे, भोजन व्यवस्थापन बाळासाहेब भांडवलकर इत्यादींचे योगदान सुरू आहे.

जाहीर आभार आणि धन्यवाद

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे अधिक मास तपोपूर्ती  निमित्त सोमवार दिनांक एक जून 2026 पासून सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह करिता देणगी देणाऱ्या सर्व भाविक, भक्तांचे श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे, अधिक मास सप्ताह समिती व सोमेश्वर प्रासादिक दिंडी सोमेश्वर मंदिर यांच्यावतीने धन्यवाद देऊन जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या