जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "सहकार महर्षि" कारखान्याच्या वतीने वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.), ऊस शेती चर्चासत्र संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 05/06/2026 : शंकरनगर- अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार दि.०५/०६/२०२६ रोजी शेती विभागीय कार्यालय, लवंग येथे वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.), ऊस शेती चर्चासत्र व सभासद स्मार्ट कार्ड वितरण कार्यक्रम सयाजीराजे मोहिते-पाटील, संचालक तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुखमंत्री, महाराष्ट्र राज्य), व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.
सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाचे संरक्षणाकरिता लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगून कारखान्याने प्रायोगिक तत्त्वावर सभासदांना स्मार्ट कार्डचे वितरण केले असून त्याचे सभासदांना होणारे फायदे, वेळेची बचत, त्वरित माहिती मिळणे याबाबत सभासद व शेतकरी यांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमास व्हॉईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, कारखान्याचे आजी माजी संचालक, डॉ.समाधान सुरवसे व डॉ.तुषार शितोळे, शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, डॉ.तुषार पोळ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, सभासद, शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.





0 टिप्पण्या