प्रासंगीक..........✍️
⭕अरे वा संयुक्त राष्ट्रसंघ जिवंत आहे तर ‼️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 04/06/2026 :
युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ ही अशी संघटना आहे की जगातील कोणतेही राष्ट्र की जे त्यांचे सदस्य आहेत ते युनोचे आदेश नाकारू शकत नाहीत.
भारतीय सरकारने 2014 पूर्वी एक दिवसही निषेध खलिता व पाकिस्तानच्या विरुद्ध तक्रार नोंदवली नाही असे घडले नाही पण भारत सरकारने केलेल्या प्रत्येक तक्रारीला युनो ने केराची टोपली दाखवली.
*युनोने नांगी टाकली*
गेले चार साडेचार वर्षे रशिया युक्रेन, इस्राईल हमास, अमेरिका इराण, इराक इराण, इस्त्राईल इराण अशी सर्व संहारक युद्धे सुरू आहे अशा कोणत्याही युद्धात युनोने आपली भूमिका बजावली नाही कारण ही राष्ट्रे आपले ऐकणार नाही याची खात्री होती.
यु नो म्हणजे अमेरिकेच्या अमेरिकेच्या बंगलेतील एक बाहुली आहे अमेरिका ठरवेल तेच युनोचे धोरण असते.
त्यामुळे माझ्या तरी वाचनात ऐकण्यात 2014 साल पासून यु नो हे नाव आले नाही त्यामुळे युनो ही संस्था जिवंत आहे का मृत आहे हे समजून येत नव्हते.
पण गेल्या चार दिवसात युनो हयात आहे हे दिसून येत आहे.
*ममताबानूचे पाप*
आपणा सर्वांना माहित आहे. आपल्या देशात रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांची संख्या दोन ते अडीच कोटीच्या घरात गेली आहे त्यांना रेशन कार्ड मिळालेली आहेत. आधार कार्ड मिळालेली आहेत ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. हे सगळे बांगलादेशी व रोहिंग्या पश्चिम बंगालच्या मार्गे भारतामध्ये प्रवेश करतात व काँग्रेस प्रणीत राज्यांच्या मार्फत साऱ्या देशभर पद्धतशीर पणे प्रस्थापित केले जातात त्यासाठी प्रार्थना स्थळे व मदरसे यांचा वापर केला जातो
आज देशातील लहान लहान गावात सुद्धा हे बांगलादेशी व रोहिंगे यांच्या वसाहती तयार झाल्या आहेत.
2014 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या घुसखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानू यांच्याकडे सरहद्दीवर कुंपण घालण्यासाठी म्हणून जागेची मागणी केली.
पण पंधरा वर्षे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेली ममता बानू हिने केंद्र सरकारला जागा मिळू दिली नाही या उलट घुसखोरीला संरक्षण दिले अगदी हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा ममता बानूने केंद्र सरकारला जागा दिली नाही
*4 मे चा चमत्कार*
चार मे 26 रोजी ममता बानू सरकारचा पराभव झाला व लगेच 24 तासाच्या आत भारत-बांगलादेश सरहद्दीवर तारेचे कंपाऊंड घालण्याचे काम जोरात सुरू झाले तेथील गोरगरीब हिंदू शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कोणतेही भरपाई न मागता सरकारच्या स्वाधीन केल्या
*आणी मेलेली युनो जिवंत*
हे सर्व संरक्षण कुंपण करण्याची काम जोरात सुरू असताना एकदम मृत असलेली युनो जागी झाली त्यांनी कागदपत्रे न पाहता व न करता विचारणा न करता भारत सरकारला कुंपण घालण्याचे काम थांबवण्याचा आदेश दिला व त्यावर कारवाईची धमकी दिली
पण आता हे मोदी सरकार आहे त्यांनी हा आदेश धाब्यावर बसून कामकाज चालू ठेवले आहे
पण युनो ही पंक्ती प्रपंच करणारी अमेरिकेच्या पंखाखाली वावरणारी व बलीष्ठ राष्ट्रांच्या दादागिरी पुढे गप्प बसणारी संस्था भारताच्या बाबतीत एकदम सक्रिय झालेली दिसते
म्हणून मी या लेखाचे शिर्षक *अरे वा संयुक्त राष्ट्र संघ जिवंत* आहे तर असे टाकले आहे
युनोच काय तर जगातील कोणतीही ताकद आता मोदी सरकारला वाकवू शकणार नाही
भारत बदल गया है
तो भारत आता नाही की जो निषेध ठराव करून तक्रारी करत होता आता अमेरिकेचा परमेश्वर सुद्धा हे काटेरी कंपाउंड घालण्याचे काम थांबवू शकणार नाही.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

0 टिप्पण्या