श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळ्याचे औचित्य साधून पर्यावरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे वृक्षारोपण संपन्न


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण सोहळ्याचे औचित्य साधून पर्यावरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे वृक्षारोपण संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथून)

 भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 05/06/2026 : 

श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथे सुरू असलेल्या श्री ग्रंथराज  ज्ञानेश्वरी व श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायण  सोहळ्याचे औचित्य साधून पर्यावरण दिनानिमित्त श्री सोमेश्वर देवस्थान परिसरात कृषीभूषण गोविंदराव पवार यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्थर्थ 5 ज्योतिर्लिंगाचे ठिकाणी " अजित बेलवन संकल्पांतर्गत" प्रत्येक ठिकाणी 250 बेलवृक्ष वृक्षारोपण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज दि.5 जून 2026 रोजी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथे वृक्षारोपणाने होत आहे.असे कृषीभूषण गोविंदराव पवार यांनी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्याशी वार्तालाप करताना सांगितले. वृक्षारोपण करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपात  वृक्षांचे पूजन  श्री सोमेश्वर मंदिरातील  स्वयंभू शिवलिंगा समोर करण्यात आले. कृषीभूषण गोविंदराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करताना मोहन मुरलीधर भांडवलकर,रविंद्र थोरात, सागर घोळवे,अविनाश कुमार, चेअरमन अनंत मोकाशी, प्रवचनकार योगेश पोतकर (कर्जत)कृषीभूषण सागर तुपे, सचिव विपुल भांडवलकर,माजी चेअरमन रामदास भांडवलकर यांच्यासह पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या