मगर 卐 आसबे शुभविवाह सोहळा संपन्न

मगर 卐 आसबे शुभविवाह सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 
आकाश भाग्यवंत नायकुडे 
अकलूज दिनांक 27/06/2026 :
कै. दिनकर ज्ञानोबा मगर यांची नात व सौ. उमा संजय दिनकर मगर राहणार निमगाव (मगराचे) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. राजवर्धिनी आणि कै. दामोदर बाळासाहेब आसबे यांचे नातू व सौ. नंदा प्रकाश दामोदर आसबे राहणार गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव मारुती यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 27/6/2026 रोजी दुपारी 12 : 29  वाजता अत्यंत थाटाने संपन्न झाला.
 श्रीराम मंगल कार्यालय तोंडले तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, यशराज गिरीश शेटे यांच्यासह  सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा मगर आणि आसबे परिवाराच्यावतीने स्वागत, सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या