गजानन नारायण कोरांटक यांचे वार्धक्यातील अल्पशा आजाराने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
निरा नरसिंहपुर :
शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी कार्यवाह, विकास व उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष, लक्ष्मी नृसिंह सह.पाणीपुरवठा संस्थेचे माजी चेअरमन आदर्श व गुणवंत जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, धर्माधिकारी गजानन नारायण कोरांटक गुरूजी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी दु.११:००वा ठाणे येथे हाॅस्पीटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
कै. गजानन नारायण कोरांटक यांचे मृतदेहावर अग्निसंस्कार विधी ठाणे येथील अमरधाम स्मशानभूमी ठाणे येथे सायंकाळी पार पडला. ते कोरांटक सरांचे ज्येष्ठ बंधू तर संदीप कोरांटक यांचे वडील होत.

0 टिप्पण्या