युनियन बँक शाखाधिकारी प्रशांत आवताडे व केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
भाळवणी प्रतिनिधी :
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात युनियन बँकेचे नूतन शाखाधिकारी प्रशांत आवताडे यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य विजय शिंदे यांच्या हस्ते तर नुतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भाळवणी केंद्र प्रमुख सतीश शिंदे यांचा पांडुरंगचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच रणजित जाधव, युवा उद्योजक शकील काझी, पत्रकार प्रशांत माळवदे, बापू वाघमारे, सोमनाथ पाटील, राजाभाऊ शिंदे, राहुल शिंदे, कल्याण गवळी,हर्षद गवळी, विलास लाले आदि मान्यवर उपस्थित होते. आभार ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या