✍️ जगातील सर्वात सुंदर आणि विनामूल्य गिफ्ट म्हणजे प्रेम आणि रिस्पेक्ट

✍️ जगातील सर्वात सुंदर आणि विनामूल्य गिफ्ट म्हणजे प्रेम आणि रिस्पेक्ट

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/06/2026 :

​आजच्या या धावपळीच्या आणि भौतिकवादी जगात आपण अनेकदा नात्यांमधील सुसंवाद हरवून बसतो. कोणाचा वाढदिवस असो, लग्न असो वा कोणताही सण, आपण बाजारातून एखादी महागडी वस्तू विकत घेतो आणि ती समोरच्याला भेट देतो. आपल्याला वाटतं की आपलं कर्तव्य संपलं. पण कधी आपण शांतपणे विचार केला आहे का, की समोरच्या व्यक्तीला नक्की कशाची गरज आहे?

​वस्तू माणसाला काही काळाचा आनंद देऊ शकते, पण आदर आणि प्रेम माणसाला आयुष्यभराची शिदोरी देतात.

वयानुसार आणि अनुभवातून माणूस एक गोष्ट नक्की शिकतो, ती म्हणजे पैशाने विकत घेतलेल्या गोष्टींची चमक काही दिवसांत कमी होते. पण जेव्हा संकटसमयी कोणीतरी आपला हात हातात घेऊन म्हणतं, "काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे," तेव्हा त्या शब्दांची किंमत जगातील कोणत्याही हिऱ्यापेक्षा जास्त असते.

माणसाला त्याच्या कठीण काळात, त्याच्या सुखात आणि दुःखात समजून घेणारे कोणीतरी हवे असते. तिच्या किंवा त्याच्या भावनांचा अनादर न करता, त्या भावनांना मान देणे हेच खऱ्या नात्याचे लक्षण आहे.

शेवटी एवढंच...

मनाचे कुलूप उघडण्यासाठी सोन्याच्या चावीची गरज नसते, तर तिथे फक्त जिव्हाळ्याच्या स्पर्शाची आणि आदराची गरज असते. म्हणून, आजपासून आपल्या माणसांना महागड्या वस्तूंपेक्षा थोडा वेळ देऊया, त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेऊया आणि त्यांना मनापासून आदर देऊया.

कारण, जगातील सर्वात सुंदर आणि विनामूल्य गिफ्ट म्हणजे प्रेम आणि रिस्पेक्ट.

ShradDhanesh's_Dairies

संकलन : प्रविण सरवदे, कराड,

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या