⭕ तांदुळवाडी जवळ विहिरीत छोटा हत्ती कोसळून आठ जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी 🟡 इरफान मुजावर च्या धाडसाने सहा जणांचे वाचले प्राण

⭕ तांदुळवाडी जवळ विहिरीत छोटा हत्ती कोसळून आठ जणांचा मृत्यू

तर सहा जण जखमी

🟡  इरफान मुजावर च्या धाडसाने सहा जणांचे वाचले प्राण

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/06/2026 :

म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन करून परत पंढरपूरकडे येत असताना, पंढरपूर-म्हसवड महामार्गावरील तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील रस्त्यालगतच्या विहिरीत छोटा हत्ती (टेम्पो) कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता. १४) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण कदम या शेतकऱ्याच्या विहिरीत घडला. याप्रकरणी वेळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. जखमींवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मृतांमध्ये वावचे आणि मातोरे या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली 

वाखरी व रांजणी येथील बावनेचे मातीरे आणि चौगुले कुटुंबांतील १४ जण सहकुटुंब व्हाव येथे गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते परत येत असताना तांदुळवाडी गाडीवरील चालकाचे नियंजय सुटल्याने छोटा हत्ती थेट विहिरीत जाऊन कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

*अपघातातील मृत अन् जखमी*

या अपघातामध्ये इंदु‌बाई दशरथ बावचे (वय६०), पूजा अमोल सातोरे (वय २३), पूजा बालाजी बाबचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १०), आरव अमोल सातोरे (वय ८), समर्थ बालाजी बावचे (वय सहा महिने, सर्व रा. पाखरी, स्यामी विवेकानंद नगर) यांचा बुडून मृत्यू झाला. 

तर सागर सावकार चौगुले, संदीप दशरथ बावचे, बालाजी दशरथ बावचे जीया बालाजी बावचे, आरव बालाजी बावचे हे जखमी झाले.

 

विहिरीत छोटा हत्ती कोसळल्याचे जवळच असलेल्या इरफान मुजावर या तरुणाने प्रत्यक्ष पाहिले. तत्काळ गावात फोन करून घटना सांगून सर्वजण लवकर या असा निरोप दिला. त्यानंतर लगेच स्वतः विहिरीत उडी घेऊन एका चिमुकल्याचे आणि अन्य तिघांचे प्राण वाचवले. प्रसंगावधान राखून दाखवलेल्या इरफान मुजावर याने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विहिरीच्या जवळ असलेल्या इरफानने प्रत्यक्ष छोटा हत्ती विहिरीत कोसळताना पाहिला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचे गांभीर्य ओळखून इरफानने विहिरीकडे धाव घेतली. कोणताही विचार न करता त्याने विहिरीत उडी मारून दोन वर्षाच्या आरवला बाहेर काढले. त्यानंतर इतर तिघांनाही त्याने तत्काळ पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचवले. इतरांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या