श्री सोमेश्वर देवस्थान करंजे यांच्या वतीने गिरीश प्रभाकर शेटे यांचा सन्मान

श्री सोमेश्वर देवस्थान करंजे यांच्या वतीने गिरीश प्रभाकर शेटे यांचा सन्मान

वृत्त एकसत्ता न्यूज 

(निलेश मोहनराव भांडवलकर यांज कडून)

सोमेश्वर, करंजे दिनांक 15/06/2026 : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) यांच्या कार्यालयास  माळशिरस तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळी सदिच्छा भेट दिली असता देवस्थानचे विश्वस्त मोहनराव मुरलीधर भांडवलकर यांच्या हस्ते मानाची शाल आणि श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खजिनदार सतीशराव भांडवलकर, सचिव विपुल विलासराव भांडवलकर, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, कौस्तुभ गिरीश शेटे यशराज गिरीश शेटे इत्यादी उपस्थित होते.

तत्पूर्वी गिरीश शेटे यांनी सहकुटुंब सहपरिवार, श्री सोमनाथांच्या जागृत आणि स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक पूजा करून दर्शन घेतले. यावेळी पुरोहित ऋषीकाका घोलप  यांनी पौराहित्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या