🟪 सह्याद्रीच्या 'व्याघ्र स्थलांतरण टीम'चा राष्ट्रीय सन्मान, वनसेवक शामराव वकटे यांचा गौरव
💥'स्पेसीज हॅबिटॅट वॉरियर अवॉर्ड' ने गौरव.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/06/2026 :
एनव्हारमेंटल टेक्नॉलॉजी' तर्फे दिला जाणारा 'स्पेसीज व हॅबिटॅट वॉरियर अवॉर्ड २०२६' हा मानाचा पुरस्कार यंदा सह्याद्री व्याघ्र राखीवच्या 'व्याघ्र स्थलांतरण टीम'ला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील वनसंवर्धन, संशोधन व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे दि. ८ रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात 'फॉरेस्ट स्टाफ अवॉर्ड' या श्रेणीत या टीमचा गौरव करण्यात आला. २०१७ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र वनविभाग, सह्याद्री व्याघ्र राखीव व भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडून यांच्या सहयोगाने 'व्याघ्र पुनर्स्थापन' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आला. अनेक
अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मोलाच्या योगदानानंतर अखेर २०२५-२६ मध्ये ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातून तारा, चंदा व हिरकणी या तीन वाघिणींचे सह्याद्रीत यशस्वी स्थलांतरण करण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या वाघिणींची निवड करून, आरआरटी ताडोबा टीमच्या मदतीने त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर ताडोबा-पेंच ते सह्याद्री असे सुमारे १००० किमीचे अंतर सुरक्षितपणे पार करून आणण्यात आले. सह्याद्रीत प्रथम 'सॉफ्ट रिलीज' व नंतर 'हार्ड रिलीज पद्धतीने त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
💥रात्रंदिवस सनियंत्रण, ७ वाघ स्थिरावले.
गेल्या नऊ महिन्यांपासून
क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण म्हणाले, हा पुरस्कार सह्याद्रीच्या प्रत्येक समर्पणाचा आहे. वाघ आणणे ही सुरुवात होती. त्यांचे संवर्धन करणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे व स्थानिकांच्या सहभागातून सह्याद्री समृद्ध करणे, हे पुढील ध्येय आहे. हा पुरस्कार आमची जबाबदारी वाढवणारा आहे. वनकर्मचाऱ्याच्या
तारा, चंदा, हिरकणी या तीन वाघिणींसह सेनापती, बाजी, सुभेदार व शिलेदार या चार नर वाघांच्या प्रत्येक हालचालीवर VHF, GPS कॉलर, कॅमेरा ट्रॅप, पी.आय.पी. व दैनंदिन गस्तीच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व वनसेवक कर्मचारी रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. या अथक परिश्रमामुळेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण सात वाघ स्थिरावले असून, सह्याद्री पुन्हा वाघांचा अधिवास बनत आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या संपूर्ण टीमच्या वतीने क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, वक्षेत्रपाल चांदोली ऋषिकेश पाटील, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक बळवंत चक्रधर, वनरक्षक राम दडस, वनसेवक शामराव वकटे, वन्यजीव वाहन चालक आनंद चाळके, वनसेवक गौरव सोनार, एज्युकेशन एक्स्टेंशन ऑफिसर सचिन धायगुडे व भारतीय वन्यजीव संस्थेचे इकोलॉजिस्ट आकाश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा मानाचा पुरस्कार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर एम. श्रीनिवास रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार किरण शेलार व ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

0 टिप्पण्या