सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/06/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक २६ जून २०२६ रोजी छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
यावेळी महाविद्यालयातील पदविका आर्टिफिशियल इंटेलिजंट अँड मशीन लर्निंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. वसिम शेख, पदविका इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुप्रिया बोंद्रे तसेच पदविका विभागातील प्रा.आरती डांगरे व प्रा. पल्लवी फुले तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. वसिम शेख यांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक व सूत्रसंचालन म्हणून प्रा. भारती चंदनकर यांनी काम पाहीले.

0 टिप्पण्या