विचारधारा

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

 भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 05/06/2026 :

आज संपूर्ण जगात *'जागतिक पर्यावरण दिन'* साजरा केला जात आहे. पर्यावरण म्हणजे केवळ सभोवतालची झाडे नव्हे, तर आपण ज्या हवेत श्वास घेतो, जे पाणी पितो आणि ज्या धरणीवर राहतो, हे सगळे पर्यावरणाचाच भाग आहेत.

परंतु मुलांनो, वाढते प्रदूषण आणि झाडांची कत्तल यामुळे आपली पृथ्वी संकटात सापडली आहे. ही पृथ्वी अधिक सुंदर बनवण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या तरुण पिढीवर आहे. आपल्या वाढदिवसाला उगीचच पार्टी करून पैसे खर्च करण्यापेक्षा, एक छानसे रोपटे लावून निसर्गाच्या सोबतीने वाढदिवस साजरा करणे कधीही उत्तम!

कचरा नेहमी कचरापेटीतच टाका, विनाकारण पाण्याचे नळ चालू ठेवू नका आणि विजेची बचत करा. तुमच्या या छोट्या-छोट्या सवयीच पुढे जाऊन पृथ्वीचे रक्षण करतील.

निसर्गावर प्रेम करा, झाडे लावा-झाडे जगवा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या