विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)

 संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

 दिनांक 07/06/2026 :

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरपूर मजा केली असेल. अभ्यासाचे ओझे नसल्यामुळे एकदम निवांत राहून भरपूर खेळला असाल, मामाच्या गावी गेला असाल आणि तिथे नवीन मित्र-मैत्रिणी देखील मिळाल्या असतील. ही सगळी गंमत अनुभवताना खूप मजा आली असेल ना?

पण मुलांनो, या सुट्ट्यांमध्ये तुम्ही नक्की कोणते खेळ खेळलात? मैदानी की बैठे खेळ? तसे पाहाता हे दोन्ही प्रकारचे खेळ खूप महत्त्वाचे आहेत. बैठे खेळ आपल्या मेंदूला धारदार व्यायाम देतात, तर मैदानी खेळ आपल्या शरीराला सुदृढ बनवतात; आणि आरोग्यासाठी हे दोन्ही व्यायाम तितकेच गरजेचे आहेत.

याशिवाय तुमच्याकडे खेळण्याचा तिसरा प्रकारही आहे, जो तुम्हाला सर्वात जास्त आवडतो पण तुमच्या पालकांना मात्र अजिबात आवडत नाही! ओळखले ना? बरोबर, 'मोबाईल गेम्स'! मनाला विरंगुळा म्हणून थोडावेळ मोबाईलवर खेळणे ठीक आहे, पण तासन्तास त्यात बुडून राहणे मात्र नक्कीच चुकीचे आहे.

मुलांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच नुकसान करतो. मोबाईल किंवा दूरदर्शनच्या (टीव्ही) स्क्रीनसमोर तासन्तास एकाच जागेवर बसून राहण्याचे तुमचे वय नाही. यामुळे डोळे, मान आणि पाठ यांच्यावर अतिरिक्त ताण येतो तो वेगळाच!

त्यामुळे आळस सोडा; रोज सकाळ-संध्याकाळ मैदानी खेळ खेळा आणि दुपारच्या वेळी घरात बसून बुद्धीला चालना देणारे बैठे खेळ भरपूर खेळा!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या