'बॉम्बे ब्लड ग्रुप' संस्था 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

 'बॉम्बे ब्लड ग्रुप' संस्था 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित



'बॉम्बे ब्लड ग्रुप' संस्था 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

वृत्त एकसत्ता न्यूज

सांगली / प्रतिनिधी

बॉम्बे ब्लड ग्रुप या दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णांसाठी अविरत सेवा देणाऱ्या तासगाव (जि. सांगली) 'चे अध्यक्ष विक्रम यादव यांच्या संस्थेला त्यांच्या सामाजिक आणि रक्तदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अरिहंतनाय रक्त सारथी संस्था, राजस्थान यांच्या वतीने मालाड ( मुंबई )  येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा' अत्यंत दिमाखदार वातावरणात  संपन्न झाला. या सोहळ्यात सामाजिक, सेवा आणि रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील 'बॉम्बे ब्लड ग्रुप' संस्थेला विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. या  कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून अनेक कार्यकर्ते आणि समाजसेवक उपस्थित होते. कॅप्टन डॉ. सुरेश कुमार सैनी,  विनय शेट्टी, अजित वाडेकर, यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभली.

बॉम्बे ब्लड ग्रुप या दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णांसाठी अविरत सेवा देणाऱ्या तासगावच्या (जि. सांगली) 'चे अध्यक्ष विक्रम यादव यांच्या संस्थेला त्यांच्या सामाजिक आणि रक्तदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रुपचे महेश चौगुले, धनंजय सूर्यवंशी, सुशांत गंगधर, सुनील साठे उपस्थित होते.



फोटो

मलाड ( मुंबई) येथे अरिहंतनाय रक्त सारथी संस्था, राजस्थान यांच्या वतीने मालाड ( मुंबई )  येथे 'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळात बॉम्बे ब्लड ग्रुपला सन्मानित करताना विनय शेट्टी, अजित वाडेकर, कॅप्टन डॉ. सुरेशकुमार सैनी सह ग्रुपचे सदस्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या