विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/06/2026 :
आता शाळा पूर्णपणे सुरू झाली आहे, म्हणजेच वर्गातील तुमचे नियमित लेखन आणि वाचन देखील सुरू झाले असेल. शाळेत तुम्हाला अभ्यासासाठी काही तास सलग एका जागेवर बसावे लागते; पण मुलांनो, वर्गात बेंचवर बसण्याची देखील एक शास्त्रशुद्ध पद्धत असते.
बेंचवर बसताना नेहमी आपली पाठ सरळ ठेवून ताठ बसले पाहिजे. समोरच्या डेस्कवर ठेवलेले पुस्तक वाचताना किंवा वहीत लिहित असताना शरीर झुकवून न बसता, ताठ बसणेच अपेक्षित असते. तसेच, आपण लिहीत असलेली वही किंवा वाचत असलेले पुस्तक आणि आपले डोळे, यांमध्ये कमीत कमी दीड फूट अंतर राखले पाहिजे.
मुलांनो, डेस्कवर पूर्णपणे झोपून, हातावर डोके ठेवून किंवा पुस्तक अगदी डोळ्यांच्या जवळ आणून कधीही वाचू किंवा लिहू नये. अशा चुकीच्या सवयींमुळे आपल्या डोळ्यांवर नाहक ताण येतो, पाठीच्या मणक्याचे आजार उद्भवतात आणि भविष्यात त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात.
त्यामुळे वाचन-लेखन करताना नेहमी ताठ बसा आणि डोळ्यांपासून पुस्तकाचे अंतर योग्य ठेवूनच अभ्यास करा!
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या