जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "रत्नत्रय संकुल" मध्ये वृक्षारोपण
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 05/06/2026 :
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, सदाशिवनगर संचलित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे आणि भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज "रत्नत्रय संकुल" मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद दोशी तसेच शहराध्यक्ष अभिजीत दोशी यांच्या हस्ते चिंच, रबर, आंबा, करंजी यांसारख्या सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडाची योग्य काळजी घेऊन ते मोठे केले, अशा विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटनेतर्फे बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
"एक झाड – हजारो श्वास, हरित भविष्यासाठी आजच सुरुवात करूया!" 🌱🌳


0 टिप्पण्या