✍️ कष्ट करुन जगणाऱ्या लोकांपेक्षा आता मत देऊन जगणारे लोक जास्त झाले आहेत..!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/06/2026 :
एकदा विद्यार्थ्याने प्रोफेसरांकडे पाहिले आणि एक विचित्र प्रश्न विचारला -
"सर, तुम्हाला रान डुकरं कशी पकडायची माहित आहे का?"
प्रोफेसरांना वाटले हा विनोद आहे... आणि त्यांनी पंचलाइन विचारली. तो तरुण म्हणाला सर... हा विनोद अजिबात नाही.
"रानडुकरे पकडण्यासाठी जंगलात योग्य जागा शोधून जमिनीवर मका टाकायचा. रानडुकरांना तो मका सापडतो आणि ते रोज फुकटचे अन्न खायला येऊ लागतात.
जेव्हां ती रोज येण्याची सवय होईल, तेव्हा ज्या ठिकाणी ती नियमित येतात त्या ठिकाणच्या एका बाजूला कुंपण घालायचे.
सुरुवातीला रानडुकरे घाबरतात, पण जेव्हा त्यांना कुंपणाची सवय होते, तेव्हा ती पुन्हा मका खाऊ लागतात आणि मग तुम्ही दुसऱ्या बाजूला कुंपण घालता.
त्यांना त्याचीही सवय होते आणि ती पुन्हा खाऊ लागतात. तुम्ही हे करत रहा, जोपर्यंत चारही बाजूंनी कुंपण पूर्ण होत नाही. शेवटच्या बाजूला एक दरवाजा ठेवा.
फुकटच्या मक्याची सवय झालेली डुकरे त्या दरवाजातून पुन्हा फुकट मका खायला येतात. मग तुम्ही त्यांच्यावर दरवाजा बंद करता आणि सगळा कळप पकडला जातो.
अचानक, रानडुकरांनी आपले स्वातंत्र्य गमावलेले असते. ती कुंपणाच्या आत धावत सुटतात, पण ती पकडली गेलेली असतात. लवकरच ती पुन्हा फुकटचा मका खाऊ लागतात.
त्यांना त्याची इतकी सवय झालेली असते की जंगलात स्वतःसाठी अन्न कसे शोधायचे हेच ती विसरुन जातात, म्हणून ती आपली कैद स्वीकारतात आणि त्यानंतर त्यांची कत्तल केली जाते."
मग तो तरुण प्रोफेसरांना म्हणाला -
"आज अनेक देशांमध्ये नेमके हेच घडत आहे.
सरकार लोकांना समाजवादाकडे ढकलत राहते आणि फुकट राशन, फुकट वीज, कर सवलती, जातीय फायदे, शेती अनुदाने, कल्याणकारी योजना, फुकट हक्क, फुकट औषधे अशा कार्यक्रमांच्या रूपाने फुकटचा मका पसरवत राहते, तर लोक हळूहळू, थोडे थोडे करुन आपले स्वातंत्र्य गमावत जातात."
एक साधे सत्य नेहमी लक्षात ठेवावे:
फुकटचे जेवण असे काही नसते.
जर तुम्हाला वाटत असेल की फुकटची सवारी तुमच्या जीवनशैलीसाठी आवश्यक आहे, तर दरवाजे बंद होतील तेव्हा देवच तुमचे रक्षण करो..!
आज आपण ज्या बहुतेक समस्यांना तोंड देत आहोत, त्या यासाठी आहेत की कष्ट करुन जगणाऱ्या लोकांपेक्षा आता मत देऊन जगणारे लोक जास्त झाले आहेत..!
ओळखीचे वाटते..??_
विचार करा...!सध्याची परिस्थिती हिच आहे
0 टिप्पण्या