मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/06/2026 :
सध्याच्या काळात 'गुंतवणूक' हा विषय प्रत्येकाच्याच तोंडी असतो. गुंतवणूक नक्की कुठे करावी, कशी करावी, त्यातून परतावा (रिटर्न्स) किती मिळेल, वगैरे वगैरे गोष्टींवर सतत चर्चा सुरू असते. त्यासाठी बाजारात अनेक कंपन्या, आर्थिक सल्लागार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील कार्यरत असतात.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पैसे अत्यंत गरजेचे असतात, यात शंकाच नाही. म्हणूनच, महिन्याची सर्वच मिळकत खर्च न करता, त्यातील काही भाग भविष्याची सोय म्हणून योग्य ठिकाणी गुंतवणे कधीही शहाणपणाचे ठरते; जेणेकरून अडचणीच्या काळात ती रक्कम आपल्या उपयोगी पडू शकते.
परंतु, या आर्थिक गुंतवणुकीच्या जोडीला अजून एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आपल्याला करावी लागते, ती म्हणजे 'माणसे जोडणे' ! अडचणीच्या वेळी आपल्याजवळ केवळ पैसे असून चालत नाही; तर धीर द्यायला, अचूक मार्गदर्शन करायला आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहायला जीवाभावाची माणसे लागतात. अशी नात्याची आणि मैत्रीची खरीखुरी माणसे आयुष्यात असणे, ही पैशांपेक्षाही फार मोठी गुंतवणूक आहे.
आजचा संकल्प
अडचणीच्या काळात फक्त पैसे जसे उपयोगी पडत नाहीत तशी नुसती जोडलेली माणसे असून पण उपयोग नसतो म्हणून पैसे व योग्य माणसे जोडण्याची गुंतवणूक करू व भविष्याची सोय करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या