वाघ 卐 पवार शुभविवाह सोहळा संपन्न

 

वाघ 卐 पवार शुभविवाह सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/06/2026 :

सौ.उषा व श्री सुरेश महादेव वाघ राहणार बागेचीवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव विकास आणि श्रीमती महानंदा व कै. मारुती भगवान पवार राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. अश्विनी यांचा शुभविवाह बुधवार दिनांक 24/6/2026 रोजी दुपारी 12 वा. 41 मि. या शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.

सूर्यचंद्र सांस्कृतिक भवन, यशवंतनगर (ग्रीन फिंगर्स समोर) तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या मंगल सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत, सन्मान वाघ आणि पवार परिवाराच्यावतीने करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या