राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळेत वह्यांचे वाटप

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळेत वह्यांचे वाटप

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/06/2026 :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्यक विचार मंच अकलूज च्या वतीने आंबेडकर चौक अकलूज नजीकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले 1 या शाळेत  सर्व मुलांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सम्यक विचार मंच अकलूज चे मार्गदर्शक, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक तथा सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर मंचचे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.



याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, मंच अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे, वृत्त एकसत्ताचे कार्यकारी संपादक विलासनंद विठ्ठल गायकवाड, सहसचिव आदिनाथ मोहन जाधव, उपाध्यक्ष राजू रामचंद्र खरात, शिवाजी दादासाहेब मागाडे, मुख्याध्यापक इक्बाल रसूल (पदवीधर), विषय शिक्षिका श्रीमती शमाबेगम शकीलअहमद मुलाणी, उपशिक्षिका श्रीमती राजश्री भागवत खरात, उपशिक्षक हनुमंत मधुकर गायकवाड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या