श्री विश्वकर्मा संघटना-अकलूजच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन

 

श्री विश्वकर्मा संघटना-अकलूजच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/06/2026 : अंधेरी ते विरार लोकल मध्ये किरकोळ कारणावरून चि.मयंक रमेश लोहार याचा एका गुंडाने धारदार शस्त्राने खून केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी विरुद्धचा खटला जलदगती न्यायालया कडे वर्ग करावा, मयताच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची आर्थिक मदत द्यावी, मुंबई रेल्वे लोकल डब्यात दोन शस्त्रधारी गार्डची नेमणूक करावी, मयताचे कुटुंबातील व्यक्तीस महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेत घ्यावे, सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी इत्यादी मागण्या  संदर्भातील निवेदन "श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज" तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगेश कदम (गृहराज्य मंत्री-शहरे-म.राज्य) यांना काल ईमेल व स्पीड पोस्टद्वारे देण्यात आले असल्याची माहिती श्री विश्वकर्मा संघटना-अकलुज चे संस्थापक पै.यशवंत अर्जुन कळसाईत(अध्यक्ष,गाडी लोहार समाज-अकलुज) यांनी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना सांगितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या